केडीएमसीच्या डोंबिवली विभागीय कार्यालयात मंगळवारी जनता दरबार
कलम भूमी, कल्याण प्रतिनिधी,
कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील नागरिकांच्या तक्रारी समजुन घेणे आणि त्यांचे जलदगतीने निराकरण करण्यासाठी दर महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी कल्याण मधील महापालिका मुख्यालयात दुपारी ३ ते ५ या वेळेत आयुक्तांच्या दालनात अभ्यागतांसाठी जनता दरबार आयोजित करण्यात येतो. तथापि जुलै मध्ये हा जनता दरबार, मंगळवार दि. ८ जुलै रोजी दुपारी ३ वाजता फ प्रभाग कार्यालय, पी.पी.चेंबर इमारत, पहिला मजला, शहीद भगत सिंह रोड, डोंबिवली (पूर्व) येथे आयोजित करण्यात आला आहे. याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी, असे आवाहन कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेमार्फत करण्यात आले आहे.
