रमेश मिसाळ यांच्या विरोधात आमरण उपोषण
कलम भूमी, कल्याण प्रतिनिधी,
कल्याण, दि. २१ जुलै – कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या मालमत्ता विभागातील अधिकारी रमेश मिसाळ यांच्या कथित अन्यायकारक व मनमानी कारभाराविरोधात आजपासून स्थानिक आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.
पुणे लिंक रोड परिसरातील रहिवाशांचे म्हणणे आहे की, मिसाळ यांच्या कार्यालयाने गेल्या अनेक महिन्यांपासून वारंवार तक्रारी असूनही त्याकडे दुर्लक्ष केले. मालमत्ता कर व नोंदणीसंदर्भातील कामे लांबवली जात असून, काही ठिकाणी भ्रष्टाचाराचे आरोपही करण्यात आले आहेत.
न्याय मागणाऱ्या नागरिकांचे निवेदन
या संदर्भात नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी महापालिकेचे आयुक्त तसेच संबंधित उच्च अधिकाऱ्यांकडे तक्रारी करूनही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे अखेर संतप्त नागरिकांनी महापालिकेसमोरच उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे.
उपोषणकर्त्यांनी मागणी केली आहे की, रमेश मिसाळ यांची चौकशी व्हावी व त्यांना तत्काळ पदावरून बाजूला करावे. अन्यथा आंदोलन अधिक तीव्र केले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.
शासन यंत्रणेची प्रतिक्रिया नाही
या गंभीर प्रकरणाकडे अद्याप महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कोणतीही ठोस प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, उपोषणकर्त्यांनी आता ही लढाई निर्णायक होईपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
रिपब्लिकन सेना नेते आनंद बाबुराव नवसागरें व ऑल इंडिया दलीत बहुजन क्रांती सेना चे दीपकभाऊ वानखेडे यांनी मिसाळ यांच्या गैर वर्तणुकी बद्दल नाराजी व्यक्त केली आहे पत्रकारांना दिलेल्या माहिती प्रमाणे रमेश मिसाळ यांच्या कार्यालयात मागणी संदर्भात निवेदनावर चर्चा करन्या साठी गेलो असता मिसाळ यांनी कोणतीच प्रतिक्रिया न देता कार्यालयातून निघून गेले असता वानखेडे हे मिसाळ यांच्या मागे गेले व उपोषण करणाऱ्या कार्यकर्तेना वेळ देण्यात यावी,असे म्हणताच मिसाळ यांनी सुरक्षा रक्षकांना सांगितले यांना माझ्या कडे कोणी पाठवले आहे,असे म्हणत यांच्या वर गुन्हा दाखल करा असे आदेश देताच वानखेडे यांनी पलट उत्तर देताना मिसाळ साहेब तुम्ही सरकारी कर्मचारी आहात तुम्ही मालक नाही,असा वाद मुख्यालयाच्या द्वारा वर घडला आहे,त्या वेळी काही पत्रकारांनी या प्रकरणी मध्यस्ती करत वाद मिटविण्याचा प्रयत्न केला होता,रिपब्लिकन सेना नेते ,आनंद बाबुराव नवसागरें व दीपक भाऊ वानखेडे यांनी मिसाळ यांच्या गैर वर्तणुकी दाखल घेत राष्ट्रीय अध्यक्ष आनंद राज आंबेडकर यांना कळवले असल्याचे सांगितले असून कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांना लवकरच मिसाळ यांच्या गैर वर्तणुकी ची माहिती देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे,


