डोंबिवली एमआयडीसीतील धोकादायक इमारतींसाठी आमदार राजेश मोरे यांची पुनर्विकासासाठी मागणी -
राज्यमंत्र्यांकडून पावसाळी अधिवेशनात सकारात्मक प्रतिसाद
कलम भूमी, कल्याण प्रतिनिधी,
कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश मोरे यांनी डोंबिवली एमआयडीसी परिसरातील धोकादायक इमारतीच्या पुनर्विकासासाठी पावसाळी अधिवेशनात शासनाकडे नियमावलीत बद्दल करण्याची मागणी केली आहे. एमआयडीसी विभागात सुदर्शन नगर,मिलाप नगर यासह अनेक निवासी भागांमध्ये गेल्या ३५ ते ४० वर्षापूर्वी बांधलेल्या इमारतींमध्ये आज गंभीर धोक्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्या इमारतींना सध्या अस्तित्वात असलेल्या नियमांमुळे पुनर्विकास करता येत नसल्याने त्यात तातडीने दुरुस्ती करावी,अशी विनंती आमदार मोरे यांनी केली. या भागातील रहिवासी कामगार वर्गातील असून,त्यांनी आयुष्यभर इथे घालवले आहे. त्यामुळे या इमारतीच्या पुनर्विकासासाठी शासनाने एमआयडीसीच्या नियमांमध्ये बद्दल करून सहकार्य करावे,अशी मागणी आमदार मोरे यांनी केली.त्यांनी कस्टर डेव्हलमेंट योजनाही राबवावी,असे सुचवले.यावर उत्तर देताना राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी सांगितले की,डोंबिवली एमआयडीसी परिसरातील ६१९ भूखंडापेकी २०० इमारतींना धोकादायक इमारती म्हणून नोटीस दिल्या आहेत. यापैकी १७ इमारतीच्या स्ट्रक्चरल ऑडिटचे अहवाल सादर झाले असून १८ इमारतीचे अहवाल प्रलंबित आहेत. एमआयडीसीच्या नियमांमध्ये काही तफावत असली तरी एक्सप्लोरेशन करून तिथे बद्दल करण्याचा विचार केला जाईल.त्यांनी टीडीआर अथोराईट आणि एफएसआय वाढीसंदर्भात नियमानुसार धोरण ठरवण्याचे आश्वासन दिले.आमदार मोरे यांनी यावर प्रतिवाद करताना सांगितले की,केवळ चर्चेपुरते न ठेवता प्रत्यक्ष बैठकीत नियम बदलून निर्णय घ्यावा.जेणेकरून या भागातील गरीब कष्टकरी नागरिकांना न्याय मिळेल.यावर राज्य मंत्री नाईक यांनी सकारात्मक विचार करण्यात येईल असे सांगितले.
