प्रेस क्लब कल्याणचा रौप्यमहोत्सवी सोहळा संपन्न,
पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांचा सत्कार, ज्येष्ठ पत्रकारांना गौरव
कलम भूमी,कल्याण प्रतिनिधी
कल्याण : प्रेस क्लब कल्याणच्या पंचवीसाव्या वर्षपूर्ती निमित्त आत्रे रंगमंदिर येथे भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी शहरातील पत्रकार, मान्यवर व पोलीस प्रशासन मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांचा गौरव
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून कल्याण पोलीस उपायुक्त अतुल झेंडे उपस्थित होते. गेल्या वर्षभरात त्यांनी कायदा व सुव्यवस्था राखताना केलेल्या कठोर कारवायांचा गौरव या प्रसंगी करण्यात आला.
ड्रग्ज व्यवसायिकांवर धडक कारवाई, गुन्हेगारांना गजाआड करणे, तसेच अल्पवयीन मुलींवरील अत्याचार करणाऱ्या नराधमांना शिक्षा मिळवून देण्यात झेंडे यांच्या भूमिकेचे विशेष कौतुक झाले.पत्रकार- पोलीस प्रशासन संवाद,
पत्रकारांनी परिसरातील विविध प्रश्न
उपायुक्त झेंडे यांच्यासमोर मांडले.
कल्याण स्टेशन परिसरातील फेरीवाले व रोड रोमिओंवर नियंत्रण, महिलांच्या सुरक्षेचे मुद्दे, तसेच सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करण्याविषयी सूचना देण्यात आल्या. यावर झेंडे यांनी समाधानकारक उत्तरे देत ठोस कारवाईचे आश्वासन दिले.ज्येष्ठ पत्रकारांचा सन्मान
प्रेस क्लबच्या रौप्यमहोत्सवी सोहळ्यात आन्ना जी बेटाआऊटकर व रमेश दुग्धाळकर या ज्येष्ठ पत्रकारांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला.कोविड काळातील मदतीचा उल्लेख
प्रेस क्लबने कोविड काळात अनेक गरजवंत पत्रकारांना दिलेली आर्थिक मदत, तसेच पंचवीस वर्षांपासून टिकवून ठेवलेली परंपरा अधोरेखित करण्यात
आली.मान्यवरांची उपस्थिती
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आनंद मोरे (अध्यक्ष, प्रेस क्लब कल्याण) यांनी भूषवले. सूत्रसंचालन अशोक कांबळे यांनी केले.
यावेळी कार्याध्यक्ष कुणाल म्हात्रे, माजी अध्यक्ष व सचिव विष्णू चौधरी, खजिनदार सचिन सागरे, सदस्य अतुल फडके, नवीन भानुशाली, सुचित्ता करमरकर, दीपक जोशी आदी मान्यवर पत्रकार उपस्थित होते.📰 प्रेस क्लब कल्याणच्या रौप्यमहोत्सवी सोहळ्याने पत्रकार,पोलीस प्रशासन यांच्यातील सबंध अधिक दृढ झाले.


