Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

heaing logo

heaing logo

सेवांच्या कालमर्यादेत कपात

नागरिकांना दिलासा

 महानगरपालिका सेवांच्या कालमर्यादेत कपात

कलम भूमी,कल्याण प्रतिनिधी,

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या अखत्यारित येणाऱ्या सेवांचा लाभ आता नागरिकांना अधिक जलद गतीने मिळणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अंतर्गत शासनाने अधिसूचित केलेल्या सेवांपैकी तब्बल 25 महत्त्वाच्या सेवांची कालमर्यादा शासन निर्णयानुसार कमी करण्यात आली आहे.

सध्याच्या घडीला शासनाकडील 68 आणि महापालिकेकडील 46 अशा एकूण 114 सेवा अधिसूचित करण्यात आल्या आहेत. मात्र या सेवांमधून अनेक अर्जदारांना ठरविक कालमर्यादा लांब असल्याने गैरसोय होत होती. त्यामुळे नागरिकांना सोयीस्कर व जलद सेवा मिळाव्यात, या उद्देशाने राज्य शासनाने कालमर्यादा कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

कमी करण्यात आलेल्या सेवांची कालमर्यादा:

🔹 15 दिवसांवरून 12 दिवस

  • दस्तऐवजाच्या आधारे मालमत्ता हस्तांतरण नोंद प्रमाणपत्र
  • वारसा हक्काने मालमत्ता हस्तांतरण प्रमाणपत्र
  • जलनि:सारण जोडणी देणे
  • अग्निशमन अंतिम नाहरकत दाखला (महानगरपालिकेसाठी)
  • पुनःकर आकारणी
  • रहिवास नसलेल्या मालमत्तांना कर सवलत
  • स्वयंमूल्यांकन
  • तात्पुरती/कायम नळजोडणी खंडीत करणे व पुनःजोडणी करणे
  • प्लंबर परवाना नुतनीकरण
  • विविध परवान्यांचे नुतनीकरण, हस्तांतरण, रद्दबातल करणे
  • कालबाह्य परवान्याकरिता नुतनीकरण सूचना

🔹 15 दिवसांवरून 7 दिवस

  • नळजोडणी देणे
  • परवाना दुय्यमप्रत मिळवणे
  • फेरीवाले नोंदणी प्रमाणपत्र

🔹 15 दिवसांवरून 10 दिवस

  • व्यवसाय परवाना स्वयं-नुतनीकरण

🔹 30 दिवसांवरून 12 दिवस

  • रस्ता खोदाई परवाना
  • राज्य खाद्य परवान्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांचा नाहरकत दाखला
  • खाद्य नोंदणी प्रमाणपत्राकरिता आरोग्य विषयक नाहरकत दाखला

🔹 30 दिवसांवरून 15 दिवस

  • महाराष्ट्र शुश्रूषा-गृह नोंदणी अधिनियम, 1949 अंतर्गत शुश्रूषागृह परवान्याचे नुतनीकरण
  • शुश्रूषागृह परवान्यावर परवानाधारक/भागीदाराचे नाव बदलणे
  • लॉजिंग हाउस परवाना नुतनीकरण
  • मंगल कार्यालय/सभागृह परवाना नुतनीकरण

🔹 30 दिवसांवरून 7 दिवस

  • पाणी अनुपलब्धता प्रमाणपत्र

नागरिकांना दिलासा

या निर्णयामुळे नागरिकांना आवश्यक असलेल्या सेवांसाठी महिनोनमहिने प्रतीक्षा करावी लागणार नाही. महापालिकेच्या विविध विभागांतून मिळणाऱ्या प्रमाणपत्रे, नोंदी, परवाने व नूतनीकरणे यासाठी लागणारा कालावधी आता मोठ्या प्रमाणात कमी झाला असून लोकांना त्वरित सेवा मिळणे सुलभ होणार आहे.

महापालिकेच्या माहिती व जनसंपर्क विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, या सेवांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक अर्ज व कागदपत्रे पूर्ण स्वरूपात जमा करावीत, जेणेकरून दिलेल्या कालमर्यादेत सेवा सहज उपलब्ध होऊ शकेल

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.