अंबिवलीत अदानी-अंबुजा सिमेंट प्रकल्पाविरोधात नागरिकांचा संताप!
वल्ली राजन,प्रदेश सचिव,राष्ट्रवादी काँग्रेस,
श्वास घ्यायचा की मरायचं?” – अंबिवलीकरांचा सरकारला सवाल
कलम भूमी,कल्याण प्रतिनिधी,
अंबिवलीतील माजी NRC फॅक्टरीच्या जागी आता अदानी समूहाची अंबुजा सिमेंट कंपनी उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आधीच कामगारांचे हक्क हिरावून घेणाऱ्या आणि त्यांच्या थकित देणग्या आजपर्यंत न चुकवणाऱ्या या अदानी समूहाने आता नागरिकांच्या श्वासावर गदा आणण्याचा उद्योग सुरू केला आहे.
तज्ञांनी इशारा दिला आहे की, या प्रकल्पामुळे निर्माण होणारी धूळ १० ते १५ किलोमीटर परिसरात प्रचंड प्रमाणात पसरून भीषण वायुप्रदूषण निर्माण करेल. यामुळे खालील आरोग्यविषयक संकटे प्रत्येक नागरिकाला भेडसावू शकतात –
- श्वसनाचे आजार
- दमा व त्याचे झटके
- फुप्फुसांचे गंभीर विकार
- सतत श्वास घेण्यास त्रास
- गुदमरून मृत्यू होण्याचाही धोका
👉 म्हणजेच, हा प्रकल्प फक्त धूळ कारखाना नसून थेट मृत्यूचा कारखाना ठरणार आहे!
स्थानिकांमध्ये आधीच संतापाची लाट आहे. नागरिकांचा ठाम आरोप आहे की, सरकार अदानी समूहाला पाठबळ देऊन गरीबांचा श्वास, आरोग्य आणि जमीन लाटत आहे. अदानींना कायद्याची भीती नाही, कारण त्यांना सत्ताधाऱ्यांचा उघड आशीर्वाद आहे.
NRC चे कामगार आजही हक्कासाठी भटकत आहेत, आणि आता त्याच जागी नागरिकांचा जीव धोक्यात घालणारा सिमेंट प्रकल्प जबरदस्तीने लादला जात आहे.
📢 नागरिकांचा इशारा –
- आम्ही गप्प बसणार नाही!
- हा प्रकल्प रद्द करा नाहीतर भीषण आंदोलन उभारले जाईल!
- जीव वाचवणे हाच खरा विकास आहे, उद्योगपतींचे नफे नव्हे.
अंबिवली व परिसरातील जनता एकत्र येऊन अदानी-अंबुजा व सरकारविरोधात निर्णायक लढा उभारण्यास सज्ज झाली आहे.असे मत वल्ली राजन,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांनी व्यक्त केले आहे,
#SaveAmbivali #StopCementFactory #AdaniGoBack #आमचा_श्वास_आमचा_हक्

