पर्यावरणपूरक व नियमांचे पालन करून गणेशोत्सव साजरा करावा
महापालिका आयुक्त अभिनव गोयल,
यावर्षी श्री गणेशोत्सवाच्या सर्व परवानगीसाठी प्रथमच ऑनलाईन प्रणालीचा वापर
कलमभूमी,कल्याण प्रतिनिधी या वर्षी पर्यावरणपूरक व नियमांचे पालन करून गणेशोत्सव साजरा करावा असे आवाहन महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी केले ,कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि पोलीस विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आचार्य अत्रे रंगमंदिरात आयोजिलेल्या बैठकीत बोलताना आयुक्त अभिनव गोयल यांनी हे प्रतिपादन केले. या बैठकीत आयुक्त अभिनव गोयल यांनी गणेशोत्सव पर्यावरणपूरक व शिस्तबद्ध पद्धतीने साजरा करण्यासाठी महत्त्वाचे मुद्द्यांवर चर्चा केली.
त्याचप्रमाणे याच वर्षी प्रथमतः श्री गणेशोत्सवाच्या परवानग्या म्हणजे महापालिका, पोलीस, महावितरण यांचेकडील परवानग्या ऑनलाइन पद्धतीने प्राप्त होतील अशीही माहिती उपस्थितांना दिली, यामुळे श्रीगणेशोत्सव मंडळांना यावर्षी परवानगीसाठी विविध कार्यालयात जाण्याची आवश्यकता राहणार नाही. तरीही एखाद्या मंडळास ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यास अडचण येत असेल तर प्रभाग स्तरावर महापालिकेने एक खिडकी योजनेची व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे तेथील कर्मचारी वर्गाचे सहकार्य अर्ज करण्यासाठी मिळू शकेल अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. महापालिका उपायुक्त समीर भूमकर यांनी ऑनलाईन पद्धतीने सर्व परवानगींसाठी अर्ज कसे करावे याबाबतचे मार्गदर्शन उपस्थित श्री गणेश मंडळांच्या प्रतिनिधींना केले.
गणेशोत्सवाच्या काळात मंडळे व नागरिकांना होणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन महापालिकेने रस्त्यांच्या दुरुस्तीबाबतच्या तक्रारी संकलित केल्या असून विसर्जन घाट आणि मिरवणुकीचे मार्ग या ठिकाणाच्या रस्त्यांची दुरुस्ती लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल तसेच जे रस्ते इतर प्राधिकरणाचे आहेत त्यांनाही याबाबत सूचना देण्यात असल्याचे आयुक्त अभिनव गोयल यांनी या बैठकीत सांगितले. नागरिकांनी, श्री गणेश मंडळांनी शक्यतो शाडू मातीच्या मूर्तींचा वापर करावा, ६ फूटापेक्षा लहान मूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलावाचा उपयोग करावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावर्षीच्या श्री गणेशोत्सवातील मिरवणुका पारंपरिक, शिस्तबद्ध व मर्यादित ध्वनीच्या माध्यमातून आयोजित कराव्यात, यावर्षीचा श्री गणेशोत्सव डीजे मुक्त गणेशोत्सव साजरा करूया असे आवाहन परिमंडळ- 3 चे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी यावेळी केले.
या बैठकीस ठाण्याचे अप्पर पोलीस आयुक्त संजय जाधव, परिमंडळ 3 चे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे, इतर पोलीस अधिकारी /कर्मचारी, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड, योगेश गोडसे, शहर अभियंता अनिता परदेशी, इतर अधिकारी वर्ग ,प्रांत अधिकारी विश्वास गुजर,तहसीलदार सचिन शेजाळ ,उल्हासनगर महानगरपालिकेतील अधिकारी वर्ग तसेच कल्याण डोंबिवलीतील श्री गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थ

