सरकारच्या निष्क्रियते विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस चा निषेध,
शेतकऱ्यांची दिवाळी काळी
कलम भूमी,कल्याण प्रतिनिधी,
कल्याण : राज्यभर अतिवृष्टी व पुराच्या तडाख्यामुळे शेतकरी आणि सामान्य जनतेचे जगणे उद्ध्वस्त झाले आहे. परंतु या गंभीर परिस्थितीकडे राज्यातील नतद्रष्ट महायुती सरकारने पूर्णतः दुर्लक्ष केल्याने शेतकऱ्यांचा संताप उसळला आहे. शासनाकडून दिली जाणारी मदत केवळ कागदोपत्री राहिली असून बळीराजाचा दिवाळी साजरी करण्याचा आनंद हिरावला गेला आहे. परिणामी यंदाची दिवाळी शेतकऱ्यांसाठी काळी व दुःखद ठरली आहे.
शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी, त्यांच्या न्यायासाठी आणि सरकारच्या निष्क्रीयतेविरुद्ध आवाज उठवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार गटाच्या कल्याण-डोंबिवली जिल्हा तर्फे आज कल्याण तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनात पुरग्रस्त व अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, पीकविमा रकमेचे तत्काळ वाटप, तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी करण्यात आली आहे. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी शासनाने त्वरित ठोस निर्णय घ्यावा, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने स्पष्ट केले आहे की, महायुती सरकारच्या खोट्या आश्वासनांमुळे व निष्क्रीय धोरणांमुळे बळीराजाचा दिवाळीचा दिवा विझला आहे. जनतेच्या वेदनांवर राजकारण न करता तत्काळ मदत द्या, अन्यथा रस्त्यावर उतरून लढा देण्याचा इशारा प्रेदेश राष्ट्रवादी पार्टीचे संघटक सचिव वल्ली राजन,भटक्या विमुक्त जमातीचे राष्ट्रवादी पार्टीचे जिल्हा अध्यक्ष,दिनेश परदेशी,व सामाजिक जेष्ठ कार्यकर्ते तोशेष शुक्ला,आदी मान्यवर कार्यकार्त्यांनी कल्याण तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे,

