Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

heaing logo

heaing logo

आरक्षण सोडत पार पाडली 2025

 

कल्याण डोंबिवली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 : आरक्षण सोडत पार पडली 

        कलम भूमी,कल्याण प्रतिनिधी 

कल्याण – कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी प्रभागनिहाय आरक्षण निश्चित करण्यासाठीची महत्त्वपूर्ण सोडत प्रक्रिया आज सकाळी कल्याण पश्चिम येथील आचार्य अत्रे रंगमंदिरात पार पडली.

या कार्यक्रमास महापालिका आयुक्त अभिनव गोयल अध्यक्षस्थानी होते. अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे, सहाय्यक संचालक नगररचना आणि महापालिका सचिव किशोर शेळके यांची प्रमुख उपस्थिती होती.

१२२ सदस्यांची निवड – ३१ प्रभाग – बहुसदस्य पद्धत

या निवडणुकीत एकूण १२२ नगरसेवकांची निवड होणार आहे.
महापालिका क्षेत्रात ३१ प्रभाग असून,

  • २ प्रभाग तीन जागांचे
  • २९ प्रभाग चार जागांचे आहेत.
  • जागांचे तपशीलवार आरक्षण

सोडतीनुसार १२२ जागांचे आरक्षण खालीलप्रमाणे घोषित करण्यात आले :

  • अनुसूचित जाती : १२ जागा
  • अनुसूचित जमाती : ०३ जागा
  • नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग : ३२ जागा
  • सर्वसाधारण : ७५ जागा

यापैकी विविध प्रवर्गांतील ६१ जागा महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत.
त्या पुढीलप्रमाणे :

  • अनुसूचित जाती (महिला) : ०६
  • अनुसूचित जमाती (महिला) : ०२
  • नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) : १६
  • सर्वसाधारण (महिला) :
  •           पुढील प्रक्रिया

सोडतीचे तपशील राज्य निवडणूक आयोगाकडे मान्यतेकरिता पाठविण्यात येणार आहेत.
आयोगाची मान्यता मिळाल्यानंतर :

  • १७ नोव्हेंबर २०२५ – आरक्षणाचे प्रारूप जाहीर
  • १७ ते २४ नोव्हेंबर २०२५ – प्रारूपावर हरकती/सूचना स्वीकारल्या जाणार

नागरिकांनी आपली हरकत किंवा सूचना निवडणूक कार्यालय, मुख्यालय येथे सादर कराव्यात, अशी माहिती आयुक्त अभनिव गोयल यांनी दिली.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपायुक्त समीर भूमकर यांनी केले.

  “चारचा पॅनेल” म्हणजे नक्की काय? | आजी-माजी नगरसेवकांनाही घोटाळा पडलेला मुद्दा!

महापालिकेच्या बहुसदस्य प्रभाग पद्धतीत एकाच प्रभागातून अनेक नगरसेवक निवडले जातात.
जेव्हा चार जागांचा प्रभाग असतो, तेव्हा पक्ष किंवा गट ४ उमेदवारांचा पॅनेल उभा करतो. यालाच सर्वसाधारण भाषेत “चारचा पॅनेल” म्हटले जाते.

         चारचा पॅनेल म्हणजे :

एका प्रभागात उपलब्ध असलेल्या ४ जागांसाठी
 एकाच पक्षाकडून किंवा गटाकडून उभे केलेले ४ उमेदवारांचा एक संच

       लोकांना का गैरसमज होतो?

  • काहींना वाटते "चारचा पॅनेल" म्हणजे चार वेगवेगळ्या विभागांतील उमेदवार!
  • काहींना वाटते एकाच व्यक्तीला चार जागा!
  • काहींना वाटते की प्रभागांची संख्या चार!

परंतु तसे नसून, प्रभागातील चार उपलब्ध जागांसाठी केलेली उमेदवारांची संघटित निवड म्हणजेच “चारचा पॅनेल.”

हे स्पष्टीकरण स्पष्टपणे न मिळाल्याने आजी-माजी नगरसेवकांनाही या तांत्रिक शब्दाचा अर्थ समजण्यात अडचणी येत असतात.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.