Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

heaing logo

heaing logo

इंदिरा गांधी,जयंती साजरी,

 

मतचोरी आणि EVM विरोधातील जनआक्रोश : बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्यास महाराष्ट्रभर काँग्रेसच विजयी – संध्या सव्वालाखे,


          कलम भूमी,कल्याण प्रतिनिधी 

कल्याण : महाराष्ट्रातील मतदारांमध्ये वाढत्या मतचोरी प्रकरणांमुळे निर्माण झालेला आक्रोश दिवसेंदिवस तीव्र होत चालला असून, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांवरील (EVM) अविश्वास सर्वोच्च पातळीवर पोचला आहे. अशा परिस्थितीत आगामी निवडणुका बॅलेट पेपरवर घेतल्या गेल्यास महाराष्ट्रातील सर्वच ठिकाणी काँग्रेस पक्ष प्रचंड बहुमताने विजयी होईल, असा ठाम विश्वास महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षा संध्या सव्वालाखे यांनी व्यक्त केला.

भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त कल्याण-डोंबिवली महिला काँग्रेस कमिटीच्या जिल्हाध्यक्षा कांचन कुलकर्णी यांच्या पुढाकाराने कल्याणमध्ये भव्य महिला संमेलन आयोजित करण्यात आले होते. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना सव्वालाखे यांनी EVM संदर्भातील गंभीर आरोप नोंदवत सत्ताधारी भाजप सरकारवर थेट निशाणा साधला.

EVM म्हणजे सत्ताधाऱ्यांचे हत्यार; जनतेचा विश्वास उडाला” – सव्वालाखे

या प्रसंगी सव्वालाखे म्हणाल्या की,
“बिहारसह विविध राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात मतचोरी झाली असून हे सत्य आता दडवून ठेवता येणार नाही. ज्यांना जनतेचा पाठिंबा नाही, तेच भाजपमध्ये जात आहेत कारण तिथे मशीन तयारच असते… फक्त बटन दाबायचं काम उरतं.”

त्यांच्या या वक्तव्याने उपस्थितांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटली असून, जनतेतील नाराजीचे प्रतिबिंब स्पष्टपणे जाणवत होते.

महिलांवरील वाढते अत्याचार आणि सरकारचे अपयश

सव्वालाखे यांनी महिलांच्या सुरक्षेच्या प्रश्नावर सरकारला थेट जबाबदार धरत म्हटले की,
“महाराष्ट्रात रोज महिलांवरील अत्याचार वाढत आहेत. भाजप सरकार महिलांचे संरक्षण करण्यात पूर्णपणे असमर्थ आहे. म्हणूनच इंदिरा गांधींना आदर्श मानून आम्ही राज्यभर महिला सुरक्षा केंद्र सुरू करत आहोत.

पैसे वाटून, आमिषे दाखवून निवडणुका जिंकण्याचा उद्योग”

आगामी महापालिका निवडणुका पारदर्शक व्हाव्यात यासाठीही सव्वालाखे यांनी Election Commission वर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
त्यांनी म्हटले :
“प्रत्येक निवडणुकीत पैशांची उधळण करून, आमिषे दाखवून आणि मशीनचा आधार घेऊन सत्ता काबीज करण्याचा प्रकार सुरू आहे. त्यामुळेच जनता संतापलेली आहे.

बॅलेट पेपर आल्यास काँग्रेसचा झेंडा महाराष्ट्रभर फडकेल”

काँग्रेसचा कार्यकर्ता कधीच पक्ष सोडून जाणार नाही असा विश्वास व्यक्त करत त्यांनी सांगितले की :
“निवडणूक आयोगाने EVM बंद करून निवडणुका बॅलेट पेपरवर घेतल्या, तर महाराष्ट्रातील प्रत्येक शहरात, गावात काँग्रेसचाच झेंडा फडकेल. कारण जनता परिवर्तनासाठी आता तयार आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.