—कर्तबगार रेल्वे पोलीसांचा वाढत्या गुन्हेगारीवर लगाम – बालकाचे अपहरण उकलून आरोपी गजाआड
कलम भूमी,कल्याण प्रतिनिधी
कल्याण : समाजात वाढत्या गुन्हेगारीला आळा बसावा आणि नागरिकांमध्ये पोलिसांबद्दल विश्वास निर्माण व्हावा, या हेतूने लोढा पोलीस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उत्कृष्ट कर्तव्यदक्षता दाखवत केवळ काही दिवसांत बालक अपहरणाचा गुन्हा उघडकीस आणत आरोपीला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण पूर्व येथील एका कुटुंबातील आठ महिन्यांच्या बालकाचे अपहरण झाल्याने परिसरात खळबळ माजली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक तसेच गुन्हे शाखेचे अधिकारी यांनी तात्काळ तपास सुरू करत सिसीटीव्ही फुटेज, गुप्त माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाचा वापर केला. या तपासातून आरोपी अक्षय शैलेश खुरे याचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले.
आरोपीकडून चौकशी केली असता, त्याने बालकाला सविता उर्फ हिना घरत यांच्या माध्यमातून आनंद मेडिकलजवळील पाटीमागे, सिंडिकेट, कल्याण(प )
येथे ठेवले असल्याची कबुली दिली. पोलिसांनी तत्परतेने त्या ठिकाणी धाव घेत बालकाची सुखरूप सुटका केली.
या जलद आणि अचूक कारवाईबद्दल नागरिकांकडून लोढा पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांचे कौतुक होत आहे. वेळेवर केलेल्या कार्यवाहीमुळे एका निरपराध बालकाचे प्राण वाचले आणि आरोपींवर कायद्याचे वर्चस्व प्रस्थापित झाले.
“गुन्हेगार कितीही चलाख असला, तरी कायद्याच्या कचाट्यातून सुटू शकत नाही” — या वाक्याची प्रचिती रेल्वे पोलिसांनी या प्रकरणातून पुन्हा एकदा दिली आहे.
