शिंदे सेनेचे उमेदवार नितीन पाटील यांचे भाजप उमेदवारांवर गंभीर आरोप
कलम भूमी, कल्याण प्रतिनिधी
डोंबिवली येथील तुकाराम नगर परिसरात आज राजकीय वातावरण चांगलेच तापले असून शिंदे सेनेचे उमेदवार नितीन पाटील यांनी भाजपच्या उमेदवार व कार्यकर्त्यांवर मतदारांना पैसे वाटप केल्याचे गंभीर आरोप केले आहेत.
नितीन पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी प्लेमपेटसह नोटांचे पाकीट वाटताना शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांना रंगेहाथ पकडले. या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून निवडणूक आचारसंहितेचा गंभीर भंग झाल्याचा आरोप करण्यात येत आहे.
या प्रकरणी नितीन पाटील यांनी तातडीने पोलिसांकडे धाव घेत, मतदारांना पैसे वाटणाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कडक कारवाई करावी, अशी ठाम मागणी केली आहे. लोकशाही प्रक्रियेला काळिमा फासणाऱ्या अशा प्रकारांना माफी नसल्याचे त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.
दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन तपास सुरू केला असता तपासादरम्यान तब्बल ६४ हजार रुपये रोख रक्कम मिळाल्याचे पोलिसांनी कबूल केले आहे. सदर रक्कम नेमकी कोणासाठी व कशासाठी होती, याचा तपास सध्या सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे
या आरोपांवर भाजपकडून तात्काळ पलटवार करण्यात आला असून, भाजपने सर्व आरोप पूर्णतः फेटाळून लावले आहेत. हा प्रकार राजकीय हेतूने बदनामी करण्यासाठी रचलेला असल्याचा दावा भाजप नेत्यांनी केला आहे.
विशेष म्हणजे, हे प्रकरण सत्तेत सहभागी असलेल्या पक्षांमध्येच घडत असल्याने, यावर पुढे काय तोडगा निघतो, पोलिसांची कारवाई कितपत निष्पक्ष राहते आणि राजकीय दबावाखाली प्रकरण दडपले जाते की कायदेशीर कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
डोंबिवलीतील या घटनेमुळे निवडणूक रणधुमाळीत पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा उडाल्याचे चित्र दिसून येत आहे.
शिंदे सेनेचे उमेदवार नितीन पाटील यांचे भाजप उमेदवारांवर गंभीर आरोप
डोंबिवली येथील तुकाराम नगर परिसरात आज राजकीय वातावरण चांगलेच तापले असून शिंदे सेनेचे उमेदवार नितीन पाटील यांनी भाजपच्या उमेदवार व कार्यकर्त्यांवर मतदारांना पैसे वाटप केल्याचे गंभीर आरोप केले आहेत.
नितीन पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी प्लेमपेटसह नोटांचे पाकीट वाटताना शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांना रंगेहाथ पकडले. या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून निवडणूक आचारसंहितेचा गंभीर भंग झाल्याचा आरोप करण्यात येत आहे.
या प्रकरणी नितीन पाटील यांनी तातडीने पोलिसांकडे धाव घेत, मतदारांना पैसे वाटणाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कडक कारवाई करावी, अशी ठाम मागणी केली आहे. लोकशाही प्रक्रियेला काळिमा फासणाऱ्या अशा प्रकारांना माफी नसल्याचे त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.
दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन तपास सुरू केला असता तपासादरम्यान तब्बल ६४ हजार रुपये रोख रक्कम मिळाल्याचे पोलिसांनी कबूल केले आहे. सदर रक्कम नेमकी कोणासाठी व कशासाठी होती, याचा तपास सध्या सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.