,,सोहळा माझ्या सखीचा’ सामाजिक गुणगौरव पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन
कल्याणमध्ये महिलांच्या कार्याचा सन्मान; मान्यवरांच्या उपस्थितीत भव्य कार्यक्रम
कल्याण प्रतिनिधी, कलम भूमी,
जपू या सामाजिक बांधिलकी संस्था (महिलांचे हक्कांचे व्यासपीठ) यांच्या वतीने ‘सोहळा माझ्या सखीचा’ सामाजिक गुणगौरव पुरस्कार वितरण सोहळा २०२४–२०२५ चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. महिलांनी विविध क्षेत्रांत केलेल्या उल्लेखनीय कार्याचा गौरव करण्याच्या उद्देशाने हा सोहळा आयोजित करण्यात आला असून, समाजप्रबोधन व साहित्य क्षेत्रालाही विशेष महत्त्व देण्यात आले आहे.
हा कार्यक्रम रविवार, दिनांक 11जानेवारी 2026 रोजी सकाळी ११.०० वाजता
के. सी. गांधी स्कूल ऑडिटोरियम, डी-मार्ट समोर, बेलबाजार, कल्याण (प.) येथे संपन्न होणार आहे कार्यक्रमाची ठळक वैशिष्ट्ये,या सोहळ्यात सामाजिक गुणगौरव पुरस्कार वितरान पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार
महिलांसाठी विशेष खेळ,
सांस्कृतिक कार्यक्रम,
लघु उद्योग सरकारी योजना मार्गदर्शन,
तसेच ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी शौर्य गाथा’ या पुस्तकाचे प्रकाशन
असे विविध उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
प्रमुख पाहुणे व मान्यवर,
या कार्यक्रमास विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती लाभणार असून प्रमुख पाहुणे म्हणून —
मा. श्री. कपिल मोरेश्वर पाटील साहेब
माजी खासदार,
केंद्रीय मंत्री – पंचायत राज, भारत सरकार
मा. श्री. जयदीपजी कावडे
अध्यक्ष – महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळ,
राज्यमंत्री दर्जा प्राप्त, महाराष्ट्र शासन
मा. श्री. विश्वनाथ आत्माराम भोइर,
आमदार ,शिंदे सेना
मा. श्रीमती डी.सी.पी. मीना मखवाना मॅडम
डेप्युटी कमिशनर ऑफ पोलिस, ठाणे शहर
मा. श्री. जतिन प्रजापती
अध्यक्ष – अस्तित्व प्रतिष्ठान, कल्याण
संयोजक व आयोजक
या कार्यक्रमाचे संयोजक
श्री. हिरामण भिमाजी क्षीरसागर
(महाराष्ट्र प्रदेश महासचिव, राष्ट्रीय ग्राहक हक्क समिती)
आहेत.
कार्यक्रमाच्या संस्थापक आयोजक
सौ. काजल राहुल प्रभाळे – घोळप
आहेत.
विशेष आकर्षण
या सोहळ्यात श्री. हिरामण भिमाजी क्षीरसागर यांनी लिहिलेल्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी शौर्य गाथा’ या पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन होणार असून, हा क्षण साहित्यप्रेमी व समाजसेवकांसाठी विशेष आकर्षण ठरणार आहे.
महिलांच्या सक्षमीकरणाचा संदेश देणारा, समाजासाठी प्रेरणादायी ठरणारा हा सोहळा कल्याण–डोंबिवली परिसरातील नागरिकांसाठी पर्वणी ठरणार असून, मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
