कल्याण–डोंबिवली महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसकडून जोरदार तयारी
मुकेश चव्हाण यांच्यावर प्रचाराची जबाबदारी,
कल्याण प्रतिनिधी, कलम भूमी,
कल्याण–डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने संघटनात्मक पातळीवर तयारीला वेग दिला आहे. येत्या १५ जानेवारी २०२५ रोजी होणाऱ्या मतदानासाठी काँग्रेस पक्षाकडून प्रचार यंत्रणा अधिक बळकट करण्यात येत असून, त्याचाच एक भाग म्हणून अंबरनाथ येथील काँग्रेसचे सक्रिय कार्यकर्ते श्री. मुकेश चव्हाण यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने दिलेल्या अधिकृत आयोजन व समन्वयाची जबाबदारी श्री. मुकेश चव्हाण यांच्याकडे देण्यात आली आहे. या प्रचार सभेतून काँग्रेस पक्षाचा विकासाचा अजेंडा, लोकहिताचे मुद्दे आणि महापालिकेतील सुशासनाचा संकल्प मतदारांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष व ठाणे जिल्हा प्रभारी श्री. राजन भोसले यांनी दिलेल्या या पत्रात, श्री. चव्हाण यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास व्यक्त करताना त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार यशस्वी व्हावेत, यासाठी प्रचार यंत्रणा प्रभावीपणे राबवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
कल्याण–डोंबिवली शहरात काँग्रेस पक्ष पुन्हा सत्तेत यावा यासाठी कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, येणाऱ्या प्रचार सभेला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहतील, असा विश्वास पक्ष नेतृत्वाकडून व्यक्त करण्यात येत आहे.

