नवकल्पनांना नवे पंख; शाश्वत व्यवसाय कल्पनांसाठी ७०% पर्यंत गुंतवणूक आणि तांत्रिक सहकार्य,
कलम भूमी,कल्याण प्रतिनिधी
डोंबिवली : आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) चा डंका जगभरात वाजत असून, येणारा काळ हा नव्या पिढीतील विद्यार्थी आणि तरुण उद्योजकांसाठी सुवर्णसंधी घेऊन येत आहे. याच पार्श्वभूमीवर Web Brigade Tech Solutions च्या नवीन कार्यालयाच्या उद्घाटनानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत नाविन्यपूर्ण आणि शाश्वत व्यवसाय कल्पनांना चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली.
या पत्रकार परिषदेत तरुण उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी व्यवहार्य आणि शाश्वत व्यवसाय कल्पना असलेल्या प्रकल्पांमध्ये ७० टक्क्यांपर्यंत गुंतवणूक करण्याची तयारी कंपनीकडून व्यक्त करण्यात आली. त्याचबरोबर तांत्रिक सहकार्य, डिजिटल प्लॅटफॉर्मची निर्मिती, AI तंत्रज्ञानाचे समाकलन तसेच मार्केटिंग आणि ब्रँडिंगसाठीही मदत दिली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
यावेळी Web Brigade Tech Solutions चे CEO श्री. रुपेश भारती यांनी सांगितले की, आज अनेक तरुणांकडे उत्तम आणि नाविन्यपूर्ण व्यवसाय कल्पना आहेत; मात्र आर्थिक पाठबळ आणि तांत्रिक मार्गदर्शनाच्या अभावामुळे त्या कल्पना प्रत्यक्षात येऊ शकत नाहीत.
“जर कोणाकडे चांगली, व्यवहार्य आणि शाश्वत व्यवसाय कल्पना असेल तर आम्ही त्या प्रकल्पासाठी ७० टक्क्यांपर्यंत आर्थिक गुंतवणूक करण्यास तयार आहोत. यासोबतच मोबाईल अॅप्लिकेशन, डिजिटल प्लॅटफॉर्म, AI Integration, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, तसेच मार्केटिंग आणि प्रमोशनसाठी आवश्यक सर्व तांत्रिक सहकार्य देण्यात येईल,” असे त्यांनी स्पष्ट केले.
ते पुढे म्हणाले की, येणाऱ्या काळात AI, डेटा अॅनालिटिक्स, ऑटोमेशन आणि डिजिटल तंत्रज्ञान यांच्या आधारे जगभरातील उद्योग क्षेत्रामध्ये मोठे बदल घडणार आहेत. त्यामुळे आज शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी फक्त नोकरीचा विचार न करता उद्योजकतेकडेही वळण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
तसेच GGUS Foundation आणि We Desi Technologies Pvt. Ltd. चे Director श्री. गगन शिंदे यांनीही या उपक्रमाबाबत आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले की, भारतात नवकल्पना आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने अनेक नवे उद्योग उभे राहण्याची मोठी क्षमता आहे.
“जर तरुणांना योग्य मार्गदर्शन, आधुनिक तंत्रज्ञान आणि आर्थिक सहाय्य मिळाले, तर ते केवळ स्वतःचा व्यवसाय उभारणार नाहीत तर देशाच्या आर्थिक प्रगतीतही मोठे योगदान देतील. AI आणि इनोव्हेशनच्या माध्यमातून शाश्वत विकास साधत मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती करण्याचा आमचा प्रयत्न असेल,” असे त्यांनी सांगितले.
या उपक्रमाच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण कल्पना असलेल्या तरुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देत तंत्रज्ञानाधारित स्टार्टअप्स उभारण्यास चालना देण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला. विशेषतः AI आधारित अॅप्लिकेशन्स, डिजिटल सर्व्हिसेस, ई-कॉमर्स, हेल्थटेक, एज्युकेशन टेक्नॉलॉजी आणि स्मार्ट सिटीसारख्या क्षेत्रांमध्ये नवीन संधी निर्माण होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
तज्ज्ञांच्या मते, येणाऱ्या काळात आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग आणि डिजिटल इनोव्हेशन या क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि तरुणांना मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञानाचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ खऱ्या अर्थाने सुवर्णसंधी ठरणार आहे.
या घोषणेमुळे डोंबिवलीसह संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील तरुण उद्योजकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, नवीन कल्पना आणि तंत्रज्ञानाच्या आधारे उद्योजकतेचा नवा अध्याय सुरू होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
