Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

heaing logo

heaing logo

कर वसुलीत सुमारे ८० टक्के यश

 करदात्यांचे कौतुक कीं मोठ्या थकबाकीकडे दुर्लक्ष?

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वतीने मालमत्ता करदात्यांचे कौतुक की मोठ्या थकबाकीकडे दुर्लक्ष?

             कलम भूमी,कल्याण प्रतिनिधी,

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वतीने मालमत्ता कर वसुलीत सुमारे ८० टक्के यश मिळाल्याबद्दल स्वतःची पाठ थोपटून घेतली जात आहे. प्रशासनाकडून करदात्यांचे आभार मानत ही कामगिरी समाधानकारक असल्याचे चित्र रंगवले जात असले, तरी वास्तवात अजूनही कोट्यवधी रुपयांची थकबाकी प्रलंबित असल्याने या कौतुकावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

महापालिकेच्या महसुलाचा कणा असलेल्या मालमत्ता करातून यंदा मोठ्या प्रमाणात वसुली झाली असली, तरी उर्वरित २० टक्के थकबाकी हीच खऱ्या अर्थाने चिंतेची बाब आहे. विशेषतः मोठे व्यावसायिक, बिल्डर्स आणि प्रभावशाली मालमत्ता धारकांकडून असलेली थकबाकी अजूनही वसूल करण्यात प्रशासनाला अपयश येत असल्याची चर्चा आहे.

प्रशासनाकडून सर्वसामान्य नागरिकांनी वेळेवर कर भरल्याबद्दल आभार मानले जात असताना, मोठ्या थकबाकीदारांवर कठोर कारवाई का होत नाही, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. केवळ टक्केवारी दाखवून यशाचा दावा करण्यापेक्षा, थकीत कोट्यवधींची वसुली करण्यावर भर देणे अधिक गरजेचे असल्याचे मत व्यक्त होत आहे.

महापालिकेने १०० टक्के वसुलीचे उद्दिष्ट ठेवले असताना, उर्वरित मोठी रक्कम वसूल करण्यासाठी विशेष मोहीम राबविणे, थकबाकीदारांची नावे जाहीर करणे आणि कठोर दंडात्मक कारवाई करणे आवश्यक असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. यश मिळाल्याबद्दल स्वतःची पाठ थोपटून घेतली जात आहे. प्रशासनाकडून करदात्यांचे आभार मानत ही कामगिरी समाधानकारक असल्याचे चित्र रंगवले जात असले, तरी वास्तवात अजूनही कोट्यवधी रुपयांची थकबाकी प्रलंबित असल्याने या कौतुकावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

महापालिकेच्या महसुलाचा कणा असलेल्या मालमत्ता करातून यंदा मोठ्या प्रमाणात वसुली झाली असली, तरी उर्वरित २० टक्के थकबाकी हीच खऱ्या अर्थाने चिंतेची बाब आहे. विशेषतः मोठे व्यावसायिक, बिल्डर्स आणि प्रभावशाली मालमत्ता धारकांकडून असलेली थकबाकी अजूनही वसूल करण्यात प्रशासनाला अपयश येत असल्याची चर्चा आहे.

प्रशासनाकडून सर्वसामान्य नागरिकांनी वेळेवर कर भरल्याबद्दल आभार मानले जात असताना, मोठ्या थकबाकीदारांवर कठोर कारवाई का होत नाही, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. केवळ टक्केवारी दाखवून यशाचा दावा करण्यापेक्षा, थकीत कोट्यवधींची वसुली करण्यावर भर देणे अधिक गरजेचे असल्याचे मत व्यक्त होत आहे.

महापालिकेने १०० टक्के वसुलीचे उद्दिष्ट ठेवले असताना, उर्वरित मोठी रक्कम वसूल करण्यासाठी विशेष मोहीम राबविणे, थकबाकीदारांची नावे जाहीर करणे आणि कठोर दंडात्मक कारवाई करणे आवश्यक असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.