नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद घरखरेदीसाठी सुवर्णसंधी!”
कल्याण-डोंबिवलीत भव्य प्रॉपर्टी प्रदर्शनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
कलम भूमी,कल्याण प्रतिनिधी
कल्याण : क्रेडाई महाराष्ट्र चेंबर ऑफ हौसिंग इंडस्ट्री (MCHI) कल्याण-डोंबिवली युनिटतर्फे आयोजित करण्यात आलेल्या भव्य प्रॉपर्टी प्रदर्शनाला नागरिकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून घरखरेदीदारांसाठी ही एक सुवर्णसंधी ठरत आहे. दि. १६ एप्रिल ते १९ एप्रिल २०२६ दरम्यान सुरू असलेल्या या प्रदर्शनात विविध बजेटमधील आधुनिक व सर्व सुविधांनी युक्त घरे एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
या प्रदर्शनात कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, टिटवाळा, शहापूर ते ठाणे परिसरातील विविध प्रोजेक्ट्स सादर करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, केवळ १६ लाखांपासून सुरू होणारी घरे ते २ कोटींपर्यंतच्या प्रीमियम प्रॉपर्टीजपर्यंत विस्तृत पर्याय उपलब्ध असल्याने प्रत्येक वर्गातील नागरिकांसाठी हे प्रदर्शन आकर्षणाचे केंद्र ठरत आहे.
या वर्षीच्या प्रदर्शनाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे “Spot Booking Discount”, ज्याचा लाभ घेण्यासाठी ग्राहक मोठ्या संख्येने पुढाकार घेत आहेत. त्यासोबतच, प्रत्येक तासाला काढण्यात येणाऱ्या “Lucky Draw” मुळे वातावरण अधिकच उत्साही बनले आहे. आकर्षक बक्षिसांमध्ये इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स, घरगुती उपकरणे, तसेच काही भाग्यवान विजेत्यांना दुचाकी वाहन जिंकण्याची संधी देण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांचा सहभाग लक्षणीयरीत्या वाढताना दिसत आहे.
४० हून अधिक नामांकित विकासक आणि १५० पेक्षा अधिक प्रोजेक्ट्स या प्रदर्शनात सहभागी झाले असून, घरखरेदीसाठी आवश्यक असलेले सर्व पर्याय, बँक लोन सुविधा, तांत्रिक सल्ला आणि ऑन-द-स्पॉट बुकिंगची सोय एकाच ठिकाणी उपलब्ध आहे. आयोजकांच्या मते, यंदा २५ हजारांहून अधिक नागरिक भेट देणार असल्याचा अंदाज असून पहिल्याच दिवसापासून मोठी गर्दी होत आहे.
या प्रदर्शनाला अनेक मान्यवरांनी भेट देत उपक्रमाचे कौतुक केले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार विश्वनाथ भोईर तसेच आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड (IAS) यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार असल्याने प्रदर्शनाची प्रतिष्ठा अधिक वाढली आहे.
MCHI कल्याण-डोंबिवली युनिटतर्फे “प्रत्येकाला आपले घर” हे स्वप्न साकार करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत असून, नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
— श्री. साकेत तिवारी (सेक्रेटरी)
— श्री. दिनेश मेहता (अध्यक्ष, एक्झिबिशन कमिटी)
— श्री. विकास जैन (अध्यक्ष)6

