जुनी पत्रकारिता ही समाजप्रबोधनाची होती, तर नवीन पत्रकारिता वेगवान
कलम भूमी, कल्याण प्रतिनिधी
जुनी पत्रकारिता हीं समाजप्रबोधनआचिहोटी,तर नवीन पत्रकारिता वेगवान झाली असली तरी मूल्यांची जपणूक होणे गरजेचे आहे,” असे परखड मत ज्येष्ठ पत्रकार यती जाधव यांनी व्यक्त केले. तर “आज खरी पत्रकारिता केवळ तीस टक्के उरली असून, सत्य आणि निर्भीड लेखन करणारे पत्रकार कमी होत चालले आहेत,” अशी खंत ठाणे जिल्हा पुण्यनगरीचे संपादक सुनील जावडेकर यांनी व्यक्त केली.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या आचार्य अत्रे नाट्यगृहातील कॉन्फरन्स हॉल येथे ‘जनमत’च्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य कार्यक्रमात पत्रकारिता, सामाजिक बांधिलकी आणि निर्भीड लेखन यावर परखड चर्चा रंगली. कार्यक्रमात अनेक ज्येष्ठ पत्रकारांचा सन्मान करण्यात आला.
‘जनमत’चे संस्थापक संपादक तुषार राजे यांनी तब्बल पस्तीस वर्षांपूर्वी अनेक संकटांना सामोरे जात ‘जनमत’ची सुरुवात केली. आर्थिक, सामाजिक आणि राजकीय दबावांमध्येही सत्याची बाजू न सोडता ‘जनमत’ने आपली वेगळी ओळख निर्माण केली असल्याचे गौरवोद्गार सुनील जावडेकर यांनी काढले. त्यांनी सांगितले की, “पत्रकारितेतील संघर्ष, धैर्य आणि समाजाप्रती असलेली बांधिलकी यामुळेच ‘जनमत’ आजही यशस्वीपणे सुरू आहे.”
यावेळी त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळ ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचे योगदान अधोरेखित करताना सांगितले की, मराठी पत्रकारिता आणि मराठी अस्मिता जपण्यासाठी या नेत्यांनी मोठे योगदान दिले.
कार्यक्रमात सुस्कृत खांडेकर यांनी ‘जनमत’ची गौरवगाथा उलगडताना सांगितले की, “‘जनमत’ या अंकाचे प्रकाशन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शुभहस्ते झाले होते. आज ठाणे जिल्ह्यात शिवसैनिकांचे मुखपत्र म्हणूनही ‘जनमत’ची ओळख निर्माण झाली आहे.” त्यांनी पुढे सांगितले की, बाळासाहेब ठाकरे हे मराठी माणसाची आन, बाण आणि शान होते आणि मराठी समाजाला दिशा देणारे खरे नेतृत्व होते.
ठाणे जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे यांनी ‘जनमत’च्या यशस्वी पत्रकारितेला शुभेच्छा देत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव केला. पत्रकारिता ही लोकशाहीचा चौथा स्तंभ असून समाजातील अन्याय, भ्रष्टाचार आणि सामान्य नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम पत्रकार करत असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमात कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या महापौरांना निमंत्रण देण्यात आले होते. मात्र त्यांच्या अनुपस्थितीबद्दल उपस्थितांनी खंत व्यक्त केली. पत्रकार आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार प्रशांत मुल्हेरकर, लेखक-साहित्यिक बारस्कर, पत्रकार भानुशाली यांच्यासह अनेक मान्यवर पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित नागरिकांनी तुषार राजे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नाटककार व लेखक सुरेश पवार यांनी प्रभावी शैलीत केले.
या वर्धापन दिन सोहळ्यातून पत्रकारितेचे बदलते स्वरूप, सत्यासाठी संघर्ष करणाऱ्या पत्रकारांची भूमिका आणि निर्भीड पत्रकारितेची आजची गरज यावर प्रकाश टाकण्यात आला. “पत्रकारिता ही केवळ व्यवसाय नसून समाजसेवेचे प्रभावी माध्यम आहे,” हा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला. पत्रकारांचे मनोबल वाढवणारा आणि नव्या पिढीतील पत्रकारांना प्रेरणा देणारा हा सोहळा ठरला.पत्रकारिता वेगवान झाली असली तरी मूल्यांची जपणूक होणे गरजेचे आहे,” असे परखड मत ज्येष्ठ पत्रकार यती जाधव यांनी व्यक्त केले. तर “आज खरी पत्रकारिता केवळ तीस टक्के उरली असून, सत्य आणि निर्भीड लेखन करणारे पत्रकार कमी होत चालले आहेत,” अशी खंत ठाणे जिल्हा पुण्यनगरीचे संपादक सुनील जावडेकर यांनी व्यक्त केली.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या आचार्य अत्रे नाट्यगृहातील कॉन्फरन्स हॉल येथे ‘जनमत’च्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य कार्यक्रमात पत्रकारिता, सामाजिक बांधिलकी आणि निर्भीड लेखन यावर परखड चर्चा रंगली. कार्यक्रमात अनेक ज्येष्ठ पत्रकारांचा सन्मान करण्यात आला.
‘जनमत’चे संस्थापक संपादक तुषार राजे यांनी तब्बल पस्तीस वर्षांपूर्वी अनेक संकटांना सामोरे जात ‘जनमत’ची सुरुवात केली. आर्थिक, सामाजिक आणि राजकीय दबावांमध्येही सत्याची बाजू न सोडता ‘जनमत’ने आपली वेगळी ओळख निर्माण केली असल्याचे गौरवोद्गार सुनील जावडेकर यांनी काढले. त्यांनी सांगितले की, “पत्रकारितेतील संघर्ष, धैर्य आणि समाजाप्रती असलेली बांधिलकी यामुळेच ‘जनमत’ आजही यशस्वीपणे सुरू आहे.”
यावेळी त्यांनी शिवसेनाप्रमुख Bal Thackeray आणि धर्मवीर Anand Dighe यांचे योगदान अधोरेखित करताना सांगितले की, मराठी पत्रकारिता आणि मराठी अस्मिता जपण्यासाठी या नेत्यांनी मोठे योगदान दिले.
कार्यक्रमात सुस्कृत खांडेकर यांनी ‘जनमत’ची गौरवगाथा उलगडताना सांगितले की, “‘जनमत’ या अंकाचे प्रकाशन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शुभहस्ते झाले होते. आज ठाणे जिल्ह्यात शिवसैनिकांचे मुखपत्र म्हणूनही ‘जनमत’ची ओळख निर्माण झाली आहे.” त्यांनी पुढे सांगितले की, बाळासाहेब ठाकरे हे मराठी माणसाची आन, बाण आणि शान होते आणि मराठी समाजाला दिशा देणारे खरे नेतृत्व होते.
ठाणे जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे यांनी ‘जनमत’च्या यशस्वी पत्रकारितेला शुभेच्छा देत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव केला. पत्रकारिता ही लोकशाहीचा चौथा स्तंभ असून समाजातील अन्याय, भ्रष्टाचार आणि सामान्य नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम पत्रकार करत असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमात कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या महापौरांना निमंत्रण देण्यात आले होते. मात्र त्यांच्या अनुपस्थितीबद्दल उपस्थितांनी खंत व्यक्त केली. पत्रकार आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार प्रशांत मुल्हेरकर, लेखक-साहित्यिक बारस्कर, पत्रकार भानुशाली यांच्यासह अनेक मान्यवर पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित नागरिकांनी तुषार राजे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नाटककार व लेखक सुरेश पवार यांनी प्रभावी शैलीत केले.
या वर्धापन दिन सोहळ्यातून पत्रकारितेचे बदलते स्वरूप, सत्यासाठी संघर्ष करणाऱ्या पत्रकारांची भूमिका आणि निर्भीड पत्रकारितेची आजची गरज यावर प्रकाश टाकण्यात आला. “पत्रकारिता ही केवळ व्यवसाय नसून समाजसेवेचे प्रभावी माध्यम आहे,” हा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला. पत्रकारांचे मनोबल वाढवणारा आणि नव्या पिढीतील पत्रकारांना प्रेरणा देणारा हा सोहळा ठरला.