एथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे कारमध्ये बिघाड; ग्राहक आयोगाचा वाहन कंपनीला मोठा दणका
ई-२० अनुकूल नसलेली कार विकल्याप्रकरणी नवीन कार देण्याचे आदेश; वाहनधारकांमध्ये संताप, आंदोलनाची शक्यता
कलम भूमी कल्याण प्रतिनिधी
रायपूर : एथेनॉल (E20) मिश्रित पेट्रोलमुळे कारमध्ये गंभीर बिघाड झाल्याच्या प्रकरणात छत्तीसगडमधील रायपूर जिल्हा ग्राहक आयोगाने वाहन उत्पादक कंपनीला मोठा दणका दिला आहे. आयोगाने मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडला संबंधित ग्राहकाची जुनी कार परत घेऊन त्याच मॉडेलची ई-२० अनुकूल नवीन कार ४५ दिवसांच्या आत देण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयामुळे देशभरातील वाहनधारकांमध्ये मोठी चर्चा सुरू झाली असून, एथेनॉलमुळे वाहनांचे नुकसान होत असल्याचा दावा करणाऱ्या अनेक चारचाकी मालकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
रायपूर येथील डॉ. प्रेमराज देब्ता यांनी ३ जून २०२४ रोजी मारुती सुझुकीच्या नेक्सा शोरूममधून नवीन कार खरेदी केली होती. काही दिवसांतच कार वारंवार बंद पडू लागल्याने ती सर्व्हिस सेंटरमध्ये नेण्यात आली. तपासणीदरम्यान इंधनाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. त्यानंतर डॉ. देब्ता यांनी सरकारी प्रयोगशाळेत पेट्रोलची तपासणी केली असता पेट्रोल टाकीत साचलेल्या पांढऱ्या पदार्थात एथेनॉलचे प्रमाण असल्याचे स्पष्ट झाले.
डॉ. देब्ता यांनी ग्राहक आयोगात तक्रार दाखल करताना, कार विकत घेताना कंपनी किंवा डीलरने संबंधित वाहनाचे इंजिन ई-२० पेट्रोलसाठी अनुकूल नसल्याची कोणतीही माहिती दिली नव्हती, असा आरोप केला. सुनावणीदरम्यान कंपनीने बिघाडासाठी खराब दर्जाच्या पेट्रोलला जबाबदार धरले. मात्र आयोगाने उपलब्ध पुरावे आणि कागदपत्रांचा अभ्यास करून संबंधित कारचे उत्पादन जानेवारी २०२३ मध्ये झाले असून तिचे इंजिन ई-२० इंधनासाठी योग्य नसल्याचे नमूद केले.
यामुळे कंपनीने ग्राहकाला आवश्यक माहिती न दिल्याने ही सेवेत त्रुटी (Deficiency in Service) असल्याचे आयोगाने स्पष्ट केले. आयोगाने कंपनीला ४५ दिवसांत जुनी कार परत घेऊन त्याच मॉडेलची ई-२० सुसंगत नवीन कार देण्याचे आदेश दिले आहेत. आदेशाची अंमलबजावणी न झाल्यास कंपनीला कारची किंमत, आरटीओ शुल्क आणि विमा रक्कम मिळून २० लाख ५० हजार ४९४ रुपये, तसेच मानसिक त्रासापोटी १ लाख रुपये आणि न्यायालयीन खर्चासाठी १० हजार रुपये देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
या निर्णयानंतर देशभरातील अनेक वाहनधारकांनी एथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे इंजिन, फ्युएल पंप, इंजेक्टर आणि इंधन प्रणालीवर परिणाम होत असल्याच्या तक्रारी पुन्हा पुढे आणण्यास सुरुवात केली आहे. अनेक कार मालक आणि चालकांमध्ये नाराजी वाढत असून, एथेनॉलमुळे होणाऱ्या कथित नुकसानाच्या पार्श्वभूमीवर चारचाकी वाहनधारक आणि चालक संघटना आंदोलनाच्या तयारीत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
तथापि, आंदोलनाच्या तयारीबाबत संबंधित संघटनांकडून अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र ग्राहक आयोगाच्या या निर्णयामुळे वाहन उत्पादक कंपन्यांनी वाहनाची तांत्रिक माहिती आणि इंधन सुसंगततेबाबत ग्राहकांना स्पष्ट माहिती देणे आवश्यक असल्याचा ठोस संदेश गेला आहे. बिघाड; ग्राहक आयोगाचा वाहन कंपनीला मोठा दणका
ई-२० अनुकूल नसलेली कार विकल्याप्रकरणी नवीन कार देण्याचे आदेश; वाहनधारकांमध्ये संताप, आंदोलनाची शक्यता
रायपूर : एथेनॉल (E20) मिश्रित पेट्रोलमुळे कारमध्ये गंभीर बिघाड झाल्याच्या प्रकरणात छत्तीसगडमधील रायपूर जिल्हा ग्राहक आयोगाने वाहन उत्पादक कंपनीला मोठा दणका दिला आहे. आयोगाने मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडला संबंधित ग्राहकाची जुनी कार परत घेऊन त्याच मॉडेलची ई-२० अनुकूल नवीन कार ४५ दिवसांच्या आत देण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयामुळे देशभरातील वाहनधारकांमध्ये मोठी चर्चा सुरू झाली असून, एथेनॉलमुळे वाहनांचे नुकसान होत असल्याचा दावा करणाऱ्या अनेक चारचाकी मालकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
रायपूर येथील डॉ. प्रेमराज देब्ता यांनी ३ जून २०२४ रोजी मारुती सुझुकीच्या नेक्सा शोरूममधून नवीन कार खरेदी केली होती. काही दिवसांतच कार वारंवार बंद पडू लागल्याने ती सर्व्हिस सेंटरमध्ये नेण्यात आली. तपासणीदरम्यान इंधनाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. त्यानंतर डॉ. देब्ता यांनी सरकारी प्रयोगशाळेत पेट्रोलची तपासणी केली असता पेट्रोल टाकीत साचलेल्या पांढऱ्या पदार्थात एथेनॉलचे प्रमाण असल्याचे स्पष्ट झाले.
डॉ. देब्ता यांनी ग्राहक आयोगात तक्रार दाखल करताना, कार विकत घेताना कंपनी किंवा डीलरने संबंधित वाहनाचे इंजिन ई-२० पेट्रोलसाठी अनुकूल नसल्याची कोणतीही माहिती दिली नव्हती, असा आरोप केला. सुनावणीदरम्यान कंपनीने बिघाडासाठी खराब दर्जाच्या पेट्रोलला जबाबदार धरले. मात्र आयोगाने उपलब्ध पुरावे आणि कागदपत्रांचा अभ्यास करून संबंधित कारचे उत्पादन जानेवारी २०२३ मध्ये झाले असून तिचे इंजिन ई-२० इंधनासाठी योग्य नसल्याचे नमूद केले.
यामुळे कंपनीने ग्राहकाला आवश्यक माहिती न दिल्याने ही सेवेत त्रुटी (Deficiency in Service) असल्याचे आयोगाने स्पष्ट केले. आयोगाने कंपनीला ४५ दिवसांत जुनी कार परत घेऊन त्याच मॉडेलची ई-२० सुसंगत नवीन कार देण्याचे आदेश दिले आहेत. आदेशाची अंमलबजावणी न झाल्यास कंपनीला कारची किंमत, आरटीओ शुल्क आणि विमा रक्कम मिळून २० लाख ५० हजार ४९४ रुपये, तसेच मानसिक त्रासापोटी १ लाख रुपये आणि न्यायालयीन खर्चासाठी १० हजार रुपये देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
या निर्णयानंतर देशभरातील अनेक वाहनधारकांनी एथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे इंजिन, फ्युएल पंप, इंजेक्टर आणि इंधन प्रणालीवर परिणाम होत असल्याच्या तक्रारी पुन्हा पुढे आणण्यास सुरुवात केली आहे. अनेक कार मालक आणि चालकांमध्ये नाराजी वाढत असून, एथेनॉलमुळे होणाऱ्या कथित नुकसानाच्या पार्श्वभूमीवर चारचाकी वाहनधारक आणि चालक संघटना आंदोलनाच्या तयारीत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
तथापि, आंदोलनाच्या तयारीबाबत संबंधित संघटनांकडून अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र ग्राहक आयोगाच्या या निर्णयामुळे वाहन उत्पादक कंपन्यांनी वाहनाची तांत्रिक माहिती आणि इंधन सुसंगततेबाबत ग्राहकांना स्पष्ट माहिती देणे आवश्यक असल्याचा ठोस संदेश गेला आहे.