Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

heaing logo

heaing logo

पवित्र नात्यालाच काळीमा


जातीय पूर्वग्रहातून घडली धक्कादायक घटना; आई-मुलीच्या पवित्र नात्यालाच काळीमा, आरोपी आई पोलिसांच्या ताब्या inत

                    कलम भूमी, कल्याण प्रतिनिधी.

 कल्याण ,उल्हासनगरमध्ये आई-मुलीच्या नात्याला काळीमा फासणारी अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्या मुलीचे दुसऱ्या जातीतील तरुणासोबत असलेले प्रेमसंबंध मान्य नसल्याच्या रागातून एका आईने स्वतःच्या मुलीचाच गळा आवळून खून केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून, जातीय मानसिकता आणि तथाकथित कौटुंबिक प्रतिष्ठेच्या नावाखाली एका निष्पाप तरुणीचा जीव गेल्याने संतापाची लाट उसळली आहे.

उल्हासनगर पोलिसांनी दिलेल्या तक मा
हितीनुसार, अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आशा मी गरूड असे आहे. तिच्या मुलीचे एका अन्य जातीतील तरुणासोबत प्रेमसंबंध होते. हे संबंध आशा गरूड यांना मान्य नव्हते. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून आई आणि मुलीमध्ये या कारणावरून सातत्याने वाद होत होते. मुलीने आपल्या निर्णयावर ठाम आहे आणि आईचा संताप अधिक वाढत गेला.

मंगळवारी रात्री घरा तील हॉलमध्ये आई आणि मुलगी दोघीच असताना पुन्हा या विषयावरून जोरदार वाद झाला. रागाच्या भरात आश

 गरूड यांनी मुलीच्या गळ्याभोवती चुनरी आवळून तिची हत्या केली. या घटनेनंतर घरात एकच खळबळ उडाली. मुलीच्या वडिलांनी तत्काळ उल्हासनगर पोलिसांना घटनेची माहिती दिली.

माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव


घेत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. प्राथमिक चौकशीनंतर आरोपी आई आशा गरूड हिला तात्काळ अटक करण्यात आली असून, तिच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास उल्हासनगर पोलीस करत आहेत.

या घटनेने समाजात अनेक प्रश्न निर्माण केले आहेत. प्रेमसंबंधांना विरोध असू शकतो, परंतु त्यातून स्वतःच्या लेकराचाच जीव घेण्याइतकी टोकाची भूमिका घेणे अत्यंत दुर्दैवी असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत. आई ही मुलांसाठी मायेची सावली मानली जाते, मात्र याच आईने मुलीच्या आयुष्याचा अंत केल्याने आई-मुलीच्या पवित्र नात्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जातीय भेदभाव, कौटुंबिक प्रतिष्ठा आणि सामाजिक दबाव यांच्या नावाखाली घडणाऱ्या अशा घटना समाजासाठी गंभीर इशारा असल्याचे मतही व्यक्त होत आहे.

या प्रकरणाबाबत उल्हासनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष अव्हाड यांनी सविस्तर माहिती देत, या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास सुरू असल्याचे सांगितले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.