Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

heaing logo

heaing logo

कुशल नेतृत्व,शशिकांत कांबळे

 

भारतीय जनता पार्टीच्या गट नेते पदी,शशिकांत कांबळे 

             कलम भूमी,कल्याण प्रतिनिधी,

कल्याण–डोंबिवली शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असलेल्या कल्याण डोंबिवली शहर विकास आघाडीच्या वतीने आज कोकण भवन येथे महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत शहर विकास आघाडीचा अधिकृत गट स्थापन करण्यात आला, ही बाब राजकीय वर्तुळात विशेष चर्चेचा विषय ठरली आहे.

या वेळी सर्वानुमते श्री. शशिकांत कांबळे साहेब यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, शहराच्या विकासासाठी अधिक प्रभावी आणि संघटित पद्धतीने काम करण्यास बळ मिळणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

श्री. शशिकांत कांबळे साहेब हे अनुभवी, अभ्यासू व संघटनात्मक बांधणीमध्ये निपुण नेतृत्व म्हणून ओळखले जातात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण–डोंबिवलीतील नागरी प्रश्न, विकासकामे, तसेच जनतेच्या अपेक्षांना न्याय देण्यासाठी आघाडी अधिक सक्रिय भूमिका बजावेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

या गट स्थापनेमुळे भारतीय जनता पार्टी आणि शहर विकास आघाडीला आगामी काळात अधिक बळ मिळणार असून, कल्याण–डोंबिवलीच्या विकासाचा वेग अधिक गतिमान होईल, अशी आशा कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

यावेळी अनेक मान्यवर पदाधिकारी, कार्यकर्ते आणि भाजपचे ज्येष्ठ नेते उपस्थित होते. सर्वांनी नवनिर्वाचित गटनेते श्री. शशिकांत कांबळे साहेब यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.