Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

heaing logo

heaing logo

सक्षम आणि जबाबदार नेतृत्व अमित मोहरे,

 

आयसीएआय’ कल्याण-डोंबिवली शाखेच्या अध्यक्षपदी सीए अमित मोहरे; आर्थिक शिस्त, पारदर्शकता आणि व्यावसायिक नेतृत्वाची नवी दिशा

            कलम भूमी,कल्याण प्रतिनिधी,

डोंबिवली : Institute of Chartered Accountants of Indiaच्या Western India Regional Council अंतर्गत कार्यरत असलेल्या कल्याण-डोंबिवली शाखेच्या वर्ष २०२६-२७ साठीच्या नवीन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली असून, अमित मोहरे (रा. डोंबिवली) यांची सर्वानुमते अध्यक्षपदी निवड झाली आहे. आर्थिक शिस्त, अचूक लेखापरीक्षण आणि पारदर्शक व्यावसायिक दृष्टिकोन यासाठी ओळख असलेल्या सीए अमित मोहरे यांच्या निवडीमुळे शाखेला सक्षम आणि जबाबदार नेतृत्व लाभल्याची भावना सभासदांमध्ये व्यक्त होत आहे.

नवीन कार्यकारिणीत उपाध्यक्षपदी प्रदीप मेहता, सचिवपदी अमृता जोशी, कोषाध्यक्षपदी ईश्वर रोहरा, विकास अध्यक्ष (WICASA) म्हणून रोहन पाठक, माजी अध्यक्ष म्हणून राकेश अग्रवाल तर कार्यकारिणी सदस्य म्हणून गिरीश तारवानी, अनुराग गुप्ता आणि विपुल शाह यांचा समावेश आहे.

कल्याण-डोंबिवली शाखेचे कार्यक्षेत्र व्यापक असून त्यामध्ये कल्याण, भिवंडी, उल्हासनगर, बदलापूर, कर्जत तसेच कसारा या भागांचा समावेश आहे. या शाखेशी सुमारे ४,८०० हून अधिक चार्टर्ड अकाउंटंट सभासद आणि १३,००० हून अधिक विद्यार्थी जोडले गेले असून, लेखाशास्त्र व वित्तीय व्यवस्थापन क्षेत्रात ही शाखा महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे.

सध्या शाखा पाच अभ्यासिका आणि दोन आयटी प्रशिक्षण केंद्रांच्या माध्यमातून भाड्याच्या जागेतून कार्यरत आहे. मात्र, वाढती सभासद व विद्यार्थी संख्या लक्षात घेता कल्याण-डोंबिवली महानगरपालिका यांच्या सहकार्याने लवकरच संस्थेची सुसज्ज स्वतंत्र इमारत उभारण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष सीए अमित मोहरे यांनी दिली.

आर्थिक धोरणांची शिस्तबद्ध अंमलबजावणी, उद्योग-व्यवसायातील पारदर्शक लेखा प्रणाली, तरुण विद्यार्थ्यांचा सर्वांगीण व्यावसायिक विकास आणि सामाजिक बांधिलकी या चार प्रमुख स्तंभांवर शाखेचे काम अधिक गतिमान करण्याचा संकल्प नवनिर्वाचित कार्यकारिणीने व्यक्त केला आहे. वित्तीय व्यवस्थापनात अचूकता आणि विश्वासार्हता निर्माण करणारे जबाबदार नेतृत्व म्हणून सीए अमित मोहरे यांची ओळख पुढील काळात अधिक भक्कम होईल, असा विश्वास व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.