Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

heaing logo

heaing logo

नियोजनबद्ध कट आरोपी अटक,


बनावट नोटा बदलण्याच्या आमिषाने ७ लाखांची लूट; टोळीचा पर्दाफाश – ९ आरोपी जेरबंद,

कल्याण : बनावट नोटा बदलून देण्याचे आमिष दाखवत ७ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा कोळसेवाडी पोलीस ठाणे पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. अवघ्या काही तासांत ९ आरोपींना अटक करून रोख रक्कम, स्कॉर्पिओ गाड्या आणि मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.

दि. ०२ मार्च २०२६ रोजी घडलेल्या या घटनेत फिर्यादी दीपक शिंदे (रा. यवली, पुणे) यांना आरोपींनी ७ लाख रुपये बदल्यात १०, ५०, १०० रुपयांच्या सुट्ट्या नोटा देण्याचे आमिष दाखवले. त्यासाठी कल्याण पूर्व परिसरात बोलावून नियोजनबद्ध कट रचण्यात आला.कसे रचले षडयंत्र फिर्यादींकडील ७ लाख रुपयांची रोकड स्कॉर्पिओ गाडीत बसवून घेतली. “तुम्ही इथे काय करता?” अशी दमदाटी करत आरोपींनी त्यांना गोंधळात टाकले आणि पैशांची बॅग हिसकावून क्षणार्धात पसार झाले. घटनेची माहिती मिळताच कोळसेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवली.तांत्रिक तपासातून मोठा धागा

सीसीटीव्ही आणि मोबाईल लोकेशनच्या आधारे आरोपींच्या स्कॉर्पिओ (MH-04-GD-7823) गाडीचा माग काढण्यात आला. अवघ्या पाच तासांत संजय नागोजीराव भोईसले, गुलाम हुसेन शेख, सोमनाथ तुळशीराम गायकवाड आणि अरविंद नागनाथ जोंधळे यांना ताब्यात घेण्यात आले.

तपासाची व्याप्ती वाढवत पोलिसांनी उल्हासनगर परिसरातून आणखी आरोपींना अटक केली. नगर-शिर्डी मार्गावरून आणखी एका स्कॉर्पिओ (MH-05-AJ-0247) गाडीचा माग काढून संबंधित आरोपींना जेरबंद करण्यात आले. मुद्देमाल जप्त

कोशल्यपूर्ण तपासात पोलिसांनी २ लाख ६६ हजार रुपये रोख रक्कम, दोन स्कॉर्पिओ गाड्या आणि १७ मोबाईल फोन जप्त केले आहेत. उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. पोलिसांची धडाकेबाज कारवाई

ही कारवाई पोलीस उपायुक्त, सहाय्यक आयुक्त आणि वरिष्ठ निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने केली. अवघ्या काही तासांत गुन्ह्याचा छडा लावून टोळीला अटक केल्याने पोलिसांचे कौतुक होत आहे.नागरिकांनी सावध राहावे

बनावट नोटा बदलून देण्याचे आमिष, जलद नफा किंवा सुट्ट्या पैशांचे प्रलोभन देणाऱ्या टोळ्यांपासून नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

ही कारवाई कल्याण परिसरात गाजली असून, गुन्हेगारांविरुद्ध पोलिसांचा धडाकेबाज इशारा असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.