Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

heaing logo

heaing logo

जागतिक महिला दिन साजरा,



जागतिक महिला दिनानिमित्त केडीएमसीचा विविध उपक्रमांचा महोत्सव; आरोग्य, सक्षमीकरण व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल

            कलम भूमीं  कल्याण प्रतिनिधी 

कल्याण–डोंबिवली महानगरपालिकेच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त “अहिल्या – जागर स्त्री शक्तीचा” या संकल्पनेवर आधारित विविध सामाजिक, आरोग्यविषयक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या ३०० व्या जयंतीचे औचित्य साधून हा विशेष कार्यक्रम ६, ७ आणि ८ मार्च २०२६ या कालावधीत शहरातील विविध ठिकाणी पार पडणार आहे.

महिलांचे आरोग्य, शिक्षण, सक्षमीकरण आणि सामाजिक सहभाग वाढविण्याच्या उद्देशाने महानगरपालिकेने अनेक उपक्रम आखले आहेत. या कार्यक्रमाचे उद्घाटन उपमहापौर राहुल दामले यांच्या हस्ते होणार असून महापौर अॅड. हर्षाली विजय चौधरी – शेट्टी तसेच आयुक्त अभिनव गोयल यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडणार आहे.

विविध उपक्रमांचे आयोजन

महिला दिनानिमित्त ६ ते ८ मार्च दरम्यान महिला बचत गटांच्या माध्यमातून खाद्यपदार्थ व विविध वस्तूंच्या विक्रीसाठी स्टॉल्स उभारण्यात येणार आहेत. हे स्टॉल्स सिटी पार्क, गोरीपाडा (कल्याण पश्चिम) येथे नागरिकांसाठी खुले असतील.

७ मार्च रोजी इयत्ता ८ वी, ९ वी व ११ वीतील किशोरवयीन विद्यार्थिनींसाठी विशेष समुपदेशन व मार्गदर्शन व्याख्यानाचे आयोजन अविचर्स कॉलेज, कल्याण (प.) येथे करण्यात आले आहे. त्याच दिवशी महानगरपालिकेच्या सर्व शाळांमध्ये हिपॅटायटिस–A लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे.

८ मार्च रोजी सकाळी इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) व महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने “रणरागिणी मॅरेथॉन” स्पर्धा गांधारी चौक, कल्याण (प.) येथे होणार आहे. महिलांमध्ये आरोग्याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.

तसेच Lighthouse Communities आणि महानगरपालिकेच्या सहकार्याने रोजगार मिळवलेल्या महिलांचा महापौरांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार असून हा कार्यक्रम कौशल्य विकास केंद्र, अंबिवली येथे होईल.

महिलांसाठी विशेष आरोग्य तपासणी

महिलांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी Tata Memorial Hospital व महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने मिशन शक्ती अंतर्गत कॅन्सर तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. हे शिबिर शास्त्रीनगर व वसंत व्हॅली येथील मनपा दवाखान्यांमध्ये होणार आहे.

सांस्कृतिक कार्यक्रम व प्रदर्शन

८ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनावर आधारित फोटो व चित्र प्रदर्शन सिटी पार्क, गोरीपाडा येथे भरविण्यात येणार आहे. त्यानंतर सायंकाळी ६ वाजल्यापासून सांस्कृतिक कार्यक्रम व कर्तृत्ववान महिलांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात येणार आहे.

महिला बचत गटांना अनुदान

महिला व बाल कल्याण विभागामार्फत महिला बचत गटांना प्रातिनिधिक अनुदान वितरण करण्यात येणार आहे. तसेच निराधार, विधवा, परित्यक्ता व घटस्फोटित महिलांच्या कुटुंबातील विवाहयोग्य मुलींना आर्थिक सहाय्य देण्याचाही कार्यक्रम यावेळी पार पडणार आहे.

या सर्व कार्यक्रमांद्वारे महिलांचे आरोग्य, शिक्षण आणि आर्थिक सक्षमीकरण यावर भर देत महिला सशक्तीकरणाचा संदेश देण्याचा महानगरपालिकेचा प्रयत्न असल्याचे प्रशासनाने सांगितले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.